गणपतीच्या पहिल्या दिवशी मुंबईतील सर्व लसीकरण केंद्र बंद !

 

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरात लसीकरण मोहीम राबवली जात आहे. तसेच आतापर्यंत मोठ्या संख्याने मुंबई जिल्ह्यात लसीकरण पूर्ण झालेले आहे. आज कोरोनाला रोखण्यासाठी प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. मात्र गणपतीच्या पहिल्या दिवशी लसीकरण केंद्र बंद असणार आहे.

महानगरपालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये आज लसीकरण होणार नाहीये. उद्या ११ सप्टेंबरला लसीकरण पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. मुंबईतील सरकारी आणि महानगरपालिका केंद्रांवर शुक्रवारी कोविड लसीकरण बंद राहणार आहे. दरम्यान, महानगरपालिकेकडे कोविड लसींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शनिवारी लसीकरण मोहीम पूर्ववत सुरु राहणार आहे.

कोरोना लसीकरण मोहिमेतंर्गत नागरिकांना दोन्ही डोस देऊन अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने विशेष सत्र राबवण्यात येत आहेत. येत्या काळातील अशा विशेष लसीकरण मोहिमांचं नियोजन प्रशासनाकडून करण्यात येतंय. त्यासाठी सरकारी आणि तांत्रिक बाबींची पूर्तता करणं आणि सर्व संबंधित लसीकरण केंद्रांना आवश्यक सूचना देण्याच्या दृष्टीने काम करण्यात येत आहे.

Team Global News Marathi: