ममता बॅनर्जी पुन्हा उमेदवारीचा अर्ज भरणार तर भाजपा देणार तगडा उमेदवार !

 

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला तृणमूल काँग्रेसने भारतीय जनता पक्षाचा पराभव करून विजयाची हॅट्रिक मारली होती. तसेच निवडणुकीच्या निकालानंतर अनेकांनी भाजपाची साथ सोडून पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये घरवापसी केली होती. त्यातच नंदिग्रामच्या पराभवानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज भवानीपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीआपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

तर पुन्हा केवडा ममता बॅनर्जी यांना पराभूत करण्यासाठी त्यांच्याविरोधात भाजपनेही जोरदार तयारी सुरु केली आहे. या हायव्होल्टेज लढतीसाठी भाजपने वकील प्रियांका टिबरेवाल यांना उमेदवारी दिली आहे. तर माकपाने श्रीजीत विश्वास यांना मैदानात उतरवलं आहे. दुसरीकडे काँग्रेसने भवानीपूरमध्ये उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे.

निवडणूक आयोगाने गेल्याच आठवड्यात पश्चिम बंगालमधील तीन विधानसभा निवडणुकांच्या पोटनिवडणुकीची घोषणा केली. पश्चिम बंगालमध्ये काही महिन्यापूर्वी विधानसभा निवडणूक झाली होती. त्यावेळी २९४ जागांपैकी २१३ जागांवर ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने विजय मिळवत, भाजपला चारीमुंड्या चीत केलं. भाजपचा पराभव झाला मात्र ७७ जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. दुसरीकडे त्या निवडणुकी ममता बॅनर्जी यांनी आपला पारंपारिक मतदारसंघ भवानीपूर सोडून नंदीग्राममधून निवडणूक लढल्या होत्या. मात्र तृणमूलमधून भाजपमध्ये गेलेल्या शुभेंदू सरकार यांनी त्यांचा पराभव केला होता.

Team Global News Marathi: