धैर्यवान साक्षी दाभेकरची आ. विद्या ठाकूर यांनी घेतली भेट

 

रायगड येथील पोलादपूर तालुक्यातील केवनाळे गावात झालेल्या भूस्खलन दुर्घटनेत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एका २ वर्षाच्या मुलाला आणि त्याच्या आईला वाचवणाऱ्या धैर्यवान साक्षी दाभेकरची आज आमदार व माजी राज्यमंत्री श्रीमती विद्या ठाकुर यांनी के.इ.एम रुग्णालयात जाऊन भेट घेतली व तिच्या तब्येतीची विचारपूस केली.

या दुर्घटनेत साक्षीने तिचा एक पाय गमावला आहे. यावेळी व्हीनस कल्चरल असोसिएशन अध्यक्ष श्री. जयप्रकाश ठाकुर हे ही उपस्थित होते. त्यांनी साक्षीच्या उपचारासाठी 25 हजार रूपयाचे आर्थिक सहाय्य केले व यापुढेही मदत करण्याचे आश्वासन दिले.

 

तसेच जयप्रकाश ठाकुर महाड-पोलादपूर येथे पाहणी करण्यासाठी जाणार असून ते साक्षी दाभेकरच्या गावाला भेट देणार आहेत. यावेळी के.इ.एम रुग्णालयाचे सहाय्यक अधिष्ठाता डॉ. प्रवीण बांगर आणि गोरेगाव भाजपचे अध्यक्ष विजय गायकवाड हे देखील उपस्थित होते.

Team Global News Marathi: