राज्यात २०१४ लाच महाविकास आघाडी स्थापन झाली असती पण” पृथ्वीराज चव्हाण यांनी केला मोठा खुलासा

 

राज्यात खर तर 2014 लाच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकास आघाडी शक्य झाली असती पण तेव्हा काँग्रेसने इच्छा दाखवली नाही अस मोठं विधान माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.
आता चव्हाण यांच्या या विधामुळे अनेक तर्कवितरकाला सुरवात झाली आहे,

तसेच पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की, २०१४ ला झालेली चूक आम्ही २०१९ ला सुधारली असून राज्यातील आघाडी सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. २०१४ साली काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले आणि राज्यात सरकार बनवण्याबाबत चर्चा केली.

मात्र, यात काँग्रेसने इच्छा दाखवली नाही. परिणामी, भाजपा सत्तेत येताच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. फडणवीस सरकारच्या काळात विरोधकांना संपवण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या. भाजपाच्या पाच वर्षाच्या सत्ता काळातील राजकीय सूडाचा अनुभव घेतल्यानंतर २०१९ सत्ता स्थापनेची आलेली संधी दोन्ही कॉंग्रेसने साधली.’

Team Global News Marathi: