मुंबईतील रेव्ह पार्टीची मनीष भानूशालीला मध्यप्रदेशातून देण्यात आली टीप

 

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला ताब्यात घेण्यात आलेल्या मुंबई क्रूज ड्रग प्रकरणी रोज नवीन माहिती समोर येत आहे. मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह ८ जणांना अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर, किरण गोसावी व भाजपाचे पदाधिकारी मनीष भानुशाली जे एनसीबीचा भाग नसले तरीही बरेच चर्चेत आहेत. त्यानंतर आता भोपाळच्या एका व्यक्तीने या दोघांना माहिती दिल्यानंतर एनसीबीने क्रूजवरील रेव्ह पार्टीवर धाड टाकली अशी माहिती समोर आली आहे.

अरबाज मर्चंटला घेऊन जाणाऱ्या मनीष भानुषालीचा व्हिडिओ खूप व्हायरल झाल्यानंतर तो भाजपचा कार्यकर्ता आहे अशी माहिती समोर आली आहे. आर्यन खानसोबत किरण गोसावीचा सेल्फी समोर आल्यानंतर हा माणूस कोण याबाबत प्रश्न विचारण्यात येत होते. याच मुद्द्यावरून विरोधकांनी भाजपावर टीका केली होती. मात्र नंतर कळले की तो एक खाजगी गुप्तहेर असून त्यांच्याविरुद्ध पुण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती समोर आली आहे.

आता या संपूर्ण प्रकरणात एक नवीन खुलासा समोर आला आहे. मनीष भानुशाली याने सांगितले की, एनसीबीने त्याच्या माहितीच्या आधारे क्रूझ जहाजावर छापा टाकला. मनीषने माध्यमांना सांगितले की ही माहिती त्याला त्याच्या एका मित्राकडून मिळाली. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, मनीषला भोपाळमध्ये राहणारा त्याचा मित्र नीरज यादवने ही टीप दिली होती. त्यानंतर नीरजला ही माहिती कुठून मिळाली असा सवाल केला असता नीरजने ही माहिती त्याच्या एका मित्राकडून मिळाली होती असे सांगितले आहे. नीरजच्या म्हणण्यानुसारी तो मित्र स्वतः १ ऑक्टोबरला क्रूझवरील पार्टीला उपस्थित राहणार होता अशी माहिती समोर आली आहे.

Team Global News Marathi: