चिंताजनक | मुंबई कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ

 

मुंबई | मुंबईत कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आलेली असताना आता पुन्हा एकदा मुंबैकरणाची चिंता वाढवणारी बातमी समोर आलेली आहे. त्यातच दक्षिण मुंबईमधील उच्चभ्रू भागात पुन्हा करोना रुग्णाची संख्या वाढू लागली असून एका कुटुंबातील अनेक सदस्यच करोनाबाधित होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. सध्या संपर्कात आलेल्या सर्व नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे.

सुट्टीच्या दिवशी पर्यटनावरुन परतलेली या परिसरातील चार कुटुंबे बाधित झाल्याचे तपासणीअंती निदर्शनास आले आहे. करोना प्रतिबंधक लशीच्या दोन मात्रा घेतल्यानंतर नागरिकांना नियमांचा विसर पडू लागला आहे. त्यामुळे बाधितांची संख्या हळूहळू वाढू लागल्याचा निष्कर्ष पालिका अधिकाऱ्यांनी काढला आहे.
काही दिवसांपूर्वीच महानरपालिकेने मुंबईला तिसऱ्या लाटेचा धोका नसल्याची माहिती उच्च न्यायालयात दिली होती.

शहरात आता पर्यंत ४२ लाख सामान्य नागरिकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. तर ८२ लाख नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. अंथरुणाला खिळलेल्या २५८६ नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. तर ३९४२ नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. सध्याचा केंद्र सरकारकडून लसींचा पुरवठा योग्य प्रमाणात सुरु असल्याने लसीकरण मोहीम पूर्ण वेगात सुरु आहे. त्यामुळे एकंदर परिस्थिती पाहता मुंबईला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका नाही, असे पालिकेने न्यायालयात सांगितले होते.

Team Global News Marathi: