नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यावर ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह म्हणतायत की,

 

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर महम्मद यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्यामुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. या वक्तव्यावरून नुपूर शर्माला भाजपमधून निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी याबाबतीत माफीही मागितली आहे. पण त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे नुपूर यांनी त्यांच्या सोशल मिडिया पोस्टद्वारे सांगितले. यादरम्यान ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे येऊन हे विष पसरण्यापासून थांबवलं पाहिजे असं मत मांडलं आहे.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये नसीरुद्दीन शाह म्हणाले, “या लोकांमध्ये चांगली भावना निर्माण होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढाकार घेतला पाहिजे. तसंच धर्मसंसदेत जे बोललं गेलं त्यावर त्यांचा विश्वास असेल तर त्यांनी तसं सांगावं आणि नसेल तर तसंही स्पष्ट करावं,” असं आवाहन त्यांनी केले आहे.

नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केल्यानंतर भाजपकडून एक पत्र जारी करण्यात आले होते. त्या पत्रात म्हटले होते की, “अशा टिप्पणी भाजपच्या मूळ कल्पनेच्या विरोधात आहेत”. या संपूर्ण प्रकरणावर नुपूर यांनी माफी देखील मागितली. त्या म्हणाल्या, मला कोणाच्याही धार्मिक भावना दुखवायच्या नव्हत्या, जर माझ्या बोलण्याने कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द माघारी घेते.

Team Global News Marathi: