योग्यरित्या मास्क न घातल्यास वाढू शकतो संसर्गाचा धोका, या अभिनेत्रींच्या डॉ पतीने दिले ट्रेनिंग !

मुंबई : संपूर्ण देशभरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यात वाढत असलेली रुग्णसंख्या चिंतेत अधिक भर घालताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर स्वतःचे कोरोना संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी मास्क वापरने अत्यंत महत्वाचे झाले आहे. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने यांच्या डॉक्टर पतीने डॉ श्रीराम नेने यांनी मास्क कसा वापरायचा या संदर्भात व्हिडिओ शेअर करून माहिती दिली आहे.

डॉ. श्रीराम नेने यांनी योग्य प्रकारे मास्क कसा घालावा? याचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी दोन मास्क घालताना कोणती काळजी घ्यावी? किंवा ते मास्क कसे घालावेत आणि कसे काढावेत याचा डेमो देखील दिला आहे. त्याचप्रमाणे अनेकजण प्रवास करताना आणि फोनवर बोलताना मास्क नाका खाली घेतात. तसेच तो अनेकदा गळ्यात देखील अडकवतात. तर ही अतिशय चुकीची पद्धत आहे.

Team Global News Marathi: