गोवा | गोवा विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. अशातच गोव्यात शिवसेना,काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपने आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. तर शुरवारी शिवसेनेने आपल्या ९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
यासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषदेत काही मतदार संघात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे स्वतः प्रचाराला उतरतील अशी माहिती दिली आहे. तसेच शिवसेना पक्ष गोव्यासाठी नवीन पक्ष नाही. इथं आमचं दमदार काम असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर या दाव्यावरूनच भाजपने त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
मी गोव्यातच आहे कोणी ओळखत नाही तुमच्या पक्षाला.उगाच उसण अवसान आणू नका.
सगळ्या उमेदवारांच्या मतांची बेरीज 1000 मतांची होणार नाही.
तरी पण शुभेच्छा ..@rautsanjay61 . https://t.co/gH6ZPEV2Rb— Ram Satpute (@RamVSatpute) January 21, 2022
“मी गोव्यातच आहे कोणी ओळखत नाही तुमच्या पक्षाला.उगाच उसणं अवसान आणू नका. सगळ्या उमेदवारांच्या मतांची बेरीज १००० मतांची होणार नाही. तरी पण शुभेच्छा ..” असा खोचक टोला भाजप नेते राम सातपुते यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना लगावला आहे.