निरव मोदी आणि मेहून चोक्सीची पंतप्रधान मोदींबरोबर चांगले संबंध असल्यामुळे कारवाई नाही – हसन मुश्रीफ

बँकांची कोट्यवधींची फसवणूक करून पारदशात पळून गेलेले नीरव मोदी आणि मेहुल चौक्सीवरून राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी धक्कादायक विधान केलं आहे. नीरव मोदी आणि चोक्सीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चांगले संबंध आहेत. त्यामुळेच या दोघांवर कारवाई केली जात नाही, असं धक्कादायक विधान हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. ते आज कोल्हापूर येथे पत्रकार माध्यमांशी बोलत होते.

मंत्री हसन मुश्रीफ यांनी मीडियाशी संवाद साधताना हे धक्कादायक विधान केलं आहे. नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी हे दोघेही गुजरातचे आहेत. त्यांचे मोदींशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे दोघांवरही कारवाई केली जात नाही, असं सांगतानाच चोक्सीला अटक केल्यानंतर देखील आपली तपास यंत्रणा हात हलवत परत येणार हे मला माहीत होतं, असं विधान मुश्रीफ यांनी केलं आहे.

चोक्सीला आणण्यासाठी भारतातून एक आठ सदस्यांचं पथक डोमिनिकाला गेलं होतं. मात्र, डोमिनिका हायकोर्टाने चोक्सीच्या प्रकरणावरील सुनावणी स्थगित ठेवली. त्यामुळे त्याचं भारताकडे प्रत्यार्पण होऊ शकलं नाही. परिणामी भारतीय पथकाला परत यावं लागलं आहे. चोक्सी आणि नीरव मोदी यांच्यावर पंजाब नॅशनल बँकेच्या काही बँक अधिकाऱ्यांशी संगनमत करून १३,५०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. मोदी सध्या लंडनच्या तुरुंगात आहे. सीबीआय या दोघांविरुद्ध चौकशी करत आहे. आता मुश्रीफ यांच्या या टीकेला भाजपा काय उत्तर देते हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: