ट्विटरनं हटवली उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या अकाउंटची ब्लू टिक

नवी दिल्ली | ट्विटरनं भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर अकाऊंटची ब्लू टीक हटवली आहे त्यामुळे एका नव्या चर्चेला उधाण आले आहे. याचच अर्थ असा की ट्विटरनं उपराष्ट्रपतींचे अकाउंट अनव्हेरिफाइड केलं आहे. ट्विटरच्या अटी आणि नियमांनुसार एखाद्या हँडलचे नाव बदललं गेलं किंवा एखादं अकाउंट सक्रिय नसेल, अपडेट नसेल तर ते अनव्हेरिफाइड केलं जातं आणि ब्लू टिक हटवली जाते.

तसेच दुसरी गोष्टी म्हणजे एखाद्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या ट्विटर हँडलसमोर ब्लू टीक असेल मात्र नंतर त्यानं कार्यालय सोडल्यास आणि व्हेरिफिकेशनचे निकष पूर्ण करत नसल्यास ब्लू टिक हटवली जाते. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर अकाऊंटची ब्लू टीक हटवल्यानं अनेकांनी संताप व्यक्त करत ट्विटरला खडेबोल सुनावले आहे. भाजप नेते सुरेश नाखुआ यांनी ट्विटरने उपराष्ट्रपतींच्या हँडलची ब्लू टिक का हटवली असा प्रश्न उपस्थित करताना हा भारताच्या संविधानावर हल्ला असल्याचं मत मांडलं आहे.

काय आहे ब्लू टिक : ट्विटरवरील ब्लू टीक ही एखादं अकाउंट मोठ्या किंवा प्रसिद्ध व्यक्तीचे अधिकृत अकाउंट असल्याचे दर्शवत असते. यात सरकारी कंपन्या, मोठे ब्रॅन्ड, मोठ्या संस्था, वृत्तसंस्था, पत्रकार, कलाकार, खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते, नेते आणि इतर बड्या व्यक्तींचा समावेश असतो. सरकारच्या नव्या गाइडलाइनवरून ट्विटर आणि सरकार यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद आहे. तसेच ट्विटरने काहीही भूमिका मांडलेली नाही.

Team Global News Marathi: