“पुढच्या १० वर्षांत निक-प्रियांकाचा घटस्फोट होईल” या अभिनेत्याने वर्तवले भाकीत |

 

बिगबॉस फॅमे कमल खान नेहमी वादग्रस्त विधाने आणि ट्विट करून चर्चेत असतानां एकही दिवसांपूर्वी त्यांनी अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कंगना राणावत ह्यांच्या चित्रपटावर भाष्य करत खिल्ली उडवली होती. आता पुन्हा एकदा कमाल खान याने नुकतेच अभिनेत्री करिना कपूरची दोन्ही मुलं आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांच्याबद्दल भविष्यवाणी केली आहे.

केआरके सोशल मीडियावर आणि विशेषतः ट्विटरवर कमालीचा सक्रिय असतो. यावेळी त्यानं अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि करिना कपूर यांच्याबद्दल भविष्यवाणी केली आहे. प्रियांकाबद्दल बोलताना केआरकेनं लिहिलं आहे की, तिचा पती निक जोनस तिला पुढच्या १० वर्षांमध्ये घटस्फोट देईल. तर दुसरीकडे त्यानं करिनाच्या मुलांबद्दल भविष्यवाणी केली आहे. करिनाच्या मुलांची नावं योग्य नसल्यानं ते आपल्या आई-वडिलांप्रमाणे उत्तम कलाकार होऊ शकणार नाही असं म्हटलं आहे.

करिना कपूर आणि प्रियांका चोप्राबाबतच्या अशा भविष्यवाणीनंतर केआरकेला सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका युझरनं कमेंट करताना लिहिलं, ‘कधीतरी कोणाबद्दल तरी चांगलं बोलत जा’ दुसऱ्या एका युझरनं लिहिलं, ‘स्वतःच्या मर्यादा कशा पाळायच्या हे तुला शिकवलं गेलं पाहिजे. ते त्याच्या आयुष्यात काहीही करु देत. पण तुला त्यांच्या खासगी आयुष्याबाबत बोलण्याचा काहीच अधिकार नाही.’

Team Global News Marathi: