मी नारायण राणेंना फोन केला होता, पण… राज ठाकरे यांनी दिली माहिती |

 

पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणे यांना स्थान मिळालं असून त्यांच्याकडे लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नारायण राणे यांनी शपथ घेतल्यानंतर राज्यातून अनेकांनी त्यांचं अभिनंदन केलं होत.

दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील शपथविधी पार पडल्यानंतर नारायण राणे यांना फोन केला होता. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असून यावेळी त्यांच्या हस्ते पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी नारायण राणे यांना फोन केल्याचे बोलिं दाखविले होते.

राज ठाकरे म्हणाले की, “मी नारायण राणेंना फोन केला होता, मात्र त्यांचा आणि त्यांच्या मुलांचादेखील फोन बंद होता. त्यामुळे मी एक दोन दिवसात फोन करेन,” असं राज ठाकरेंनी यावेळी सागितलं. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच मन मोठं नाहीये ते मला फोन करणार नाही असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बोलून दाखविले होते.

Team Global News Marathi: