पुढील दोन-तीन दिवसात टाळेबंदीचा निर्णय घेतला जाईल – किशोरी पेडणेकर

 

मुंबई | सध्या कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत आहे. परंतू वैज्ञानिकांकडून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सरकारने निर्बंध पुन्हा कडक केले आहेत. मात्र दुसरीकडे व्यापारी वर्गाने मुंबईमध्ये आंदोलन केलं होतं. त्यामध्ये नियमित दुकाने खुली ठेवण्याची मागणी करण्यात आली होती. यावरून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एक वक्तव्य केलं.

आंदोलन करणाऱ्या या व्यापाऱ्यांना काही राजकारणी भडकावत असल्याचा आरोप करत, किशोरी पेडणेकर यांनी भारतीय जनता पक्षावर नाव न घेता निशाणा साधला आहे.ते आज मुंबई प्रसार माध्यमांशी संवाद साधताना बोलतात होत्या. मुंबईमध्ये कोरोना संसर्ग बाधितांची रुग्णसंख्या नियंत्रणात येत आहे. मात्र त्याचे समूळ उच्चटन झालेले नाही. त्याचप्रमाणे काही भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अजुनही दिसून येत असल्याचं त्यांनी सांगितलं.

त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता पुढील दोन-तीन दिवसांमध्ये टाळेबंदीचा निर्णय होणार असल्याचं पेडणेकरांनी सांगितलं आहे. तसेच गुरूवारी येत्या गुरूवारी म्हणजेच १५ जूलै रोजी टाळेबंदी संबंधित बैठकही होणार असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. त्या बैठकीमध्ये सध्याच्या नियमांमध्ये काही सूट मिळण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचंही त्या म्हटल्या आहेत.

Team Global News Marathi: