नितेश राणे यांच्याकडे जी प्रगल्भता, ती दुर्दैवाने शिवसेनेकडे नाही – आशिष शेलार

 

सांगली | नितेश राणे यांनी सिंधुदुर्गात बोलताना, पक्षादेश दिल्यास कोणासोबतही काम करु असं म्हटलं होतं. त्यावरुन आमदार आशिष शेलारांनी नितेश राणेंचं कौतुक करत शिवसेनेला टोला लगावला आहे. ते आज सांगली येथे दौऱ्यावर आलेले असताना आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राणे यांचे तोंडभरून कौतुक केले होते.

नितेश राणे, शिवसेना खासदार विनायक राऊत आणि दीपक केसरकर हे वेंगुर्ल्यात एकाच व्यासपीठावर आले होते. त्यावेळी वरिष्ठांनी आदेश दिला तर एकत्र काम करु असं नितेश राणे म्हणाले. तर विनायक राऊतांनीही नितेश राणेंची पाठ थोपटली होती. यावर आशिष शेलार यांनी स्पष्टीकरण देताना, नितेश राणे बोलले ही त्यांची प्रगल्भता आहे. दुर्दैवाने ती शिवसेनेकडे नाही, असं शेलार म्हणाले.

वेंगुर्ले नगरपरिषदेच्या वेंगुर्ले सागररत्न मत्य बाजारपेठे लोकार्पणाच्या निमित्ताने रविवारी शिवसेना खासदार विनायक राऊत आणि नितेश राणे एकत्र, एकाच व्यासपीठावर आले होते. शिवसेना खासदार आणि शिवसेना सचिव विनायक राऊत, शिवसेना आमदार दीपक केसरकर आणि भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण, भाजपचे आमदार नितेश राणे एकाच व्यासपीठावर होते. राणे आणि सेना यांच्यातील राजकीय वैर नेहमी पहायला मिळते. मात्र यावेळी चित्र उलट होते.

Team Global News Marathi: