मुंबईत तुंबणाऱ्या पावसाच्या पाण्यावर राजकारण करणाऱ्या विरोधकांचा सामनातून समाचार |

 

मुंबई | रविवारी पावसाने मुंबईला अक्षरशः झोडपून काढले होते, त्यात अनेक सखल भागात पाणी साचून अनेकांच्या घरातच पावसाचे पाणी शिरले होते. या घडलेल्या प्रकारावरून विरोधात बसलेल्या भाजपने सत्तेत बसलेल्या शिवसेनेला टार्गेट केले होते. आता या टीकेला शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून प्रत्युत्तर दिलं आहे.

शनिवारच्या मध्यरात्री मुंबईत दुर्घटनांची दरड कोसळली ती अनैसर्गिक पावसामुळेच. मुंबई पावसामुळे काही झालं की महापालिकेच्या नावाने बोटं मोडणाऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, असं म्हणत शिवसेनेनं अग्रलेखातून विरोधकांना चांगलेच फटकारले आहे.

मुंबईत शनिवारी आणि रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने ३० जणांचे बळी घेतले. एकूण ११ ठिकाणी दुर्घटना घडल्या. त्यातील मोठी दुर्घटना चेंबूरमध्ये घडली. तर दुसरीकडे संरक्षत भिंत घरांवर कोसळली. या दोन्ही दुर्घटनांमध्ये १७ जणांचा मृत्यू झाला. मध्यरात्रीची साखरझोप या जीवांसाठी काळझोपच ठरली, असं सामना अग्रलेखात म्हंटले आहे.

मुंबईतील डोंगरउतारांवरील वसाहतींमध्ये लाखापेक्षा जास्त नागरिक राहत आहेत. गेल्या २० वर्षांत त्यातील २०० पेक्षा जास्त लोकांचा दुर्घटनांमध्ये जीव गेला आहे. ही डोंगरउतारावरील घरे काय किंवा जुन्या धोकादायक इमारती काय, मुंबईचा एक गंभीर आणि गुंतागुंतीचा प्रश्न बनला आहे, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

Team Global News Marathi: