कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत ६० लाख नागरिक बाधित होतील – राजेश टोपे

 

 जालना  | सध्या संपूर्ण जगभरात कुरणा संसर्गाने हाहाकार माजवला आहे. त्यातच कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका वर्तवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता आतापासूनच आवश्यक औषधे, वैद्यकीय उपकरणे शहरी आणि ग्रामीण भागात उपलब्धता आणि पुरेसा साठा राहील याची खबरदारी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विभागास दिल्या आहेत.

कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. यातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जवळपास ६० लाख लोकांना कोरोनाची लागण होण्याचा अंदाज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे जालन्यात पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री टोपे यांनी म्हटलं की, कोरोनाची तिसरी लाट जर आली, तर राज्याला सुमारे ४ हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज निर्माण होऊ शकते. पहिल्या लाटेत 20 लाख लोक बाधित झाले होते. दुसऱ्या लाटेत ४० लाख लोकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे तिसऱ्या लाटेत साधारण ६० लाख नागरिकांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता आहे, असा अंदाज टोपे यांनी व्यक्त केला आहे.

Team Global News Marathi: