” एनसीबीला तंबाखू आणि गांजामधला फरक कळत नाही याचं आश्चर्य वाटतं”

 

मुंबई | सध्या एनसीबी अधिकारी आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरु झाले आहे. त्यापूर्वी मलिक यांनी एनसीबीवर अनेक गंभीर आरोप लावले आहे. यावर आता जावयावर केलेल्या कारवाईवर मलिक म्हणाले माझ्या जावयाकडे गांजा सापडलाच नाही. जावयाच्या घरातून जे जप्त करण्यात आलं ते हर्बल तंबाखू होतं. हा माझा दावा नाही तर कोर्टाच्या ऑर्डरमध्ये तसं म्हटलं आहे. त्यामुळे एनसीबीला हर्बल तंबाखू आणि गांजा यातील फरक कळतो की नाही?’ असा सवाल विचारत मंत्री नवाब मलिक यांनीएनसीबीवर गंबीर आरोप केले आहेत.

एनसीबीकडून केल्या जाणाऱ्या कारवाया या बनावट आहेत. या संपूर्ण प्रकरणात माझ्या जावयाला नाहक अडकवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. असं म्हणत नवाब मलिक यांनी एनसीबीच्या कारवाईबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मलिक यांचे जावई समीर खान यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. यावेळी कोर्टाने जामीन अर्ज मंजूर करताना असं म्हटलं होतं की, समीर खान यांच्याबाबत ड्रग्ज सिंडिकेटचा कोणताही पुरावा आढळलेला नाही. याच मुद्द्यावर नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन एनसीबीच्या एकूण कार्यशैलीवर टीका केली आहे.

‘छापेमारीत माझ्या जावयाकडे २०० किलो गांजा सापडला असा आरोप एनसीबीने लावला होता. पण साडेसात ग्राम गांजा हा फर्निचरवालाकडे मिळाला. बाकी सर्व गोष्टी या हर्बल टोबॅको होत्या. हे मी नाही म्हणत. तर कोर्टाच्या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे एनसीबीला तंबाखू आणि गांजामधला फरक कळत नाही याचं आश्चर्य वाटतं असा टोला सुद्धा त्यांनी लगावला होता.

Team Global News Marathi: