“पीएम केअर फंडमध्ये जमा झालेला पैसा कुठे जातोय?” माजी न्यायमूर्तीने व्यक्त केली चिंता

 

नवी दिल्ली | पी एम केअरमध्ये जमा होणाऱ्या पसिहवेर यापूर्वी सुद्धा अनेकदा विरोधकांनी संशय व्यक्त केला होता. सदर पैसा देशहितासाठी वापरला जातो की इतर कामासाठी वापरला जातो अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र आता पी एम केअर मध्ये जमा होणाऱ्या पैशावर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मदन बी.लोकूर यांनी शंका उपस्थित केली आहे.

पीएम केअर फंडमध्ये जमा पैसा कुठे जातोय हे आम्हाला माहिती नाही ,अशी माहिती सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मदन बी.लोकूर यांनी दिली. तसेच माहिती अधिकार कायद्याला कमकुवत केले जात असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.ते म्हटले आहे. माहिती अधिकार कायद्याला १६ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

माजी न्यायमूर्ती मदन बी लोकूर यांनी याविषयी म्हटले, ‘सामान्य नागरिक आणि बड्या उद्योजकांनी दान केलेले करोडो रुपये कसे खर्च केले जात आहेत याबद्दल सार्वजनिक स्तरावर कोणतीही माहिती उपलब्ध नाही’. ‘उदाहरण म्हणून आपला पीएम केअर फंडचं घेऊयात. यामध्येही करोडो रुपये आहेत.

सरकारी कर्मचाऱ्यांनी पैसे दान केले आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण फंडात किती पैसा आहे हे आपल्याला माहिती नाही. तो कसा खर्च करण्यात आला आपल्याला माहिती नाही. याचा उपयोग व्हेंटिलेटर खरेदी करण्यासाठी केला जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. पण वास्तवात तसं झालं का? आपल्याला माहिती नाही,’ असे जस्टीस लोकूर यांनी सांगितले.

Team Global News Marathi: