नावतडीचं मीठ आळणी अमृता फडणवीस यांच्या टीकेला महापौर पेडणेकर यांचे सडेतोड उत्तर !

 

मुंबई | ठाकरे सरकारच्या कोरोना संदर्भातील निर्बंधांवर आणि पुण्यातील मेट्रोच्या श्रेयावादाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. तसेच पुण्यातील कोरोना परिस्थितीवरुन निर्बंध न हटविण्याच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलं.

अमृता फडणवीस यांनी केलेल्या टीकेसंदर्भात मुंबईच्या महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांना पत्रकार माध्यमांनी प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना, नावतडीचं मीठ आळणी अशी टीका त्यांनी अमृता फडणवीस यांच्यावर केली आहे.

कोण अमृता फडणवीस? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी का? नावडतीचं मिठ अळणी, अशी त्यांची अवस्था झाल्याचे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले. तसेच आपल्याला त्यांच्याबद्दल जास्ती बोलायचं नाही, असं म्हणत त्यांनी विषयही टाळला.

मात्र, मोजक्याच शब्दात त्यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीकाही केला. दरम्यान, अमृता फडणवीस यांनी गुरूवारी पुण्यात एका कार्यक्रमाला हजेरी लावली. येथील धागा हॅन्डलूम महोत्सवाचं पुण्यात आयोजन करण्यात आलं असून, महोत्सवाचं उद्घाटन अमृता फडणवीस यांच्या हस्ते झालं. यावेळी पत्रकार माध्यमाशी बोलताना त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली होती.

Team Global News Marathi: