चित्रा वाघ यांना शिवसेनेत यायचं होतं पण… शिवसेनेच्या या महिला नेत्याने केला खुलासा !

 

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी अनेकांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला सोडचिट्टी देऊन शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्याच प्रमाणे शरद पवार यांच्या अत्यंत विश्वासू समजल्या जाणाऱ्या चित्रा वाघ यांनी सुद्धा राष्ट्रवादी पक्षाला सोडचिट्टी देऊन भाजपात प्रवेश केला होता. मात्र त्यांना भाजपात न जात शिवसेनेत यायचे होते असा खुलासा शिवसेना नेत्या आणि आमदार मनीषा कायंदे यांनी केला आहे.

चित्रा वाघ यांना शिवसेनेत प्रवेश करायचा होता. पण त्यांचा प्रवेश शिवसेनेने नाकारला. म्हणूनच त्या शिवसेनेवर आगपाखड करत आहेत,’ असा गौप्यस्फोट शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी केला. तसेच त्यांनी आपल्या काही गोष्टी झाकण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला, असा टोला देखील त्यांनी लगावला.

‘शिवसेनेच्या एकाही नेत्याने अद्याप बीफचे समर्थन केलेले नाही. पण भाजपच्या नेत्यांची बीफचं समर्थन करणारी यादी भलीमोठी आहे. ती यादी चित्रा वाघ यांनी शोधावी. काहीतरी बोलायचं आणि मोठ्या माणसांचं नाव घ्यायचं. हे सवंग प्रसिद्धीसाठी होत असून त्यांची आता सवय झाली आहे,’ असे उपरोधिक भाष्य कायंदे यांनी केले.

Team Global News Marathi: