नवाब मलिक यांचे कारस्थान आता हळूहळू जनतेसमोर येत असून अशी व्यक्ती महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राहू शकते का?

 

भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.अलिबाग येथील कोर्लई ग्रामपंचायतीच्या हद्दीत रश्मी ठाकरे यांच्या नावावर असलेल्या जागेत १९ बंगल्यांचा उल्लेख आहे मात्र, ते बंगले आता नाहीयेत. या संदर्भात किरीट सोमय्या यांनी राज्यपालांची भेट घेत त्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर किरीट सोमय्यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधताना नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे त्यावरही भाष्य केलं आहे.

नवाब मलिक यांचे कारस्थान आता हळूहळू जनतेसमोर येत आहेत.मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विनंती केली आहे की, अशी व्यक्ती महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राहू शकते का? या संबंधी तपास करावा. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे तर माफियांना मदत करत असतात. म्हणून सकाळपासून ईडी-किरीट सोमय्या अशी परत ट्यून वाजवण्यास सुरुवात केली आहे

पुढे बोलताना सोमय्या म्हणाले की, अजित पवारांनी त्याला ब्लॅकमेल केलं त्यावर उद्धव ठाकरे आणि शरद पवार का बोलत नाहीत? असा सवालही किरीट सोमय्यांनी उपस्थित केला आहे चौकशीत नवाब मलिकांचे कारस्थान बाहेर आले तर निश्चितपणे भाजप महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने मागणी करणार की ही व्यक्ती महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राहू शकत नाही असंही किरीट सोमय्या म्हणाले.

Team Global News Marathi: