“सत्तेच्या माडीसाठी ईडीची शिडी, विनाकारण मारी धाडीवर धाडी” अमोल कोल्हे यांचा विरोधकांना टोला

 

मुंबई | राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना आज भल्या पहाटे चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले आहे.जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान मलिकांवर ईडीने चौकशी लावल्यानंतर रास्त्रवडीचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यात अगदीच सरकार स्थापन झाल्यापासून मागच्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणाच्या गैरव्यवहाराबाबत महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार सातत्याने केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधताना दिसत आहे. यातच आता राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईविरोधात महाविकास आघाडीतील नेते आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार अमोल कोल्हे यांनी ट्विटरवर एक कविता शेअर करून नवाब मलिकांना पाठिंबा दर्शवला आहे.

काय आहे ती कविता?

सत्तेच्या माडीसाठी
ईडीची शिडी
विनाकारण मारी
धाडीवर धाडी
सलते सत्तेवरील
महा-आघाडी
म्हणून कमळाबाई
ती लाविते काडी
तपासयंत्रणा झाल्या
कमळीच्या सालगडी
पाकळ्यांमध्ये नाहीत का
काहीच भानगडी?

पण लक्षात ठेवा…
पुरून उरेल सर्वांना
रांगडा राष्ट्रवादी गडी

असे ट्विट अमोल कोल्हे यांनी केले आहे.

अंडरवर्ल्डशी कथित संबंध असलेल्या मालमत्तेप्रकरणी ईडीने नवाब मलिक यांना समन्स बजावले होते. आता या प्रकरणी नवाब मलिकची चौकशी केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) नेते मलिक येथील ईडी कार्यालयात पोहोचले आणि ‘प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट’ (पीएमएलए) अंतर्गत जबाब नोंदवत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Team Global News Marathi: