नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यावर शिवसेना खासदार अनिल देसाई यांची प्रतिक्रिया |

 

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळात भाजपा नेते आणि माजी उख्यमंत्री नारायण राणे यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून काल शपथ घेतली. नारायण राणे यांना महाराष्ट्रात शिवसेनेला शह देण्यासाठी आणि आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याची चर्चा सुरु आहे. यावर शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपने त्यांना केंद्रात मंत्रिपद दिलं आहे. बघुया ते काय करतात. हा शह वगैरे काही नाही. कोण कुणाला अंगावर घेतं ते बघा तुम्ही. कोकण आणि शिवसेना हे नेहमीच समीकरण राहिलं आहे. त्यामुळे कोकणचे लोक आणि शिवसेनेते कधीही अंतर पडणार नाही असे विधान अनिल देसाई यांनी केले आहे.

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर अनेक चढउतार आले, त्याबाबत काय सांगाल असं विचारला आहे. १९९९ ला मुख्यमंत्री झालो. त्यानंतर अनेक चढउतार आले. आता मोदींच्या नेतृत्वात हे पद मिळालं आहे. त्यांनी टाकलेला विश्वास सार्थकी लावेन असा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बोलून दाखविले होता.

Team Global News Marathi: