मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे आता चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे शिवसैनिक संतापले असून त्यांच्यावर आत्तापर्यंत तीन ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. तर नगरसेवक अमेय घोले यांनी थेट बँनरबाजी करून कोंबडी चोर असा उल्लेख केला आहे. तसेच तर त्यांना अटक करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
मात्र दुसरीकडे शिवसैनिकांनी राणेंच्या वक्तव्याचा निषेध केला असला तरी भाजपाने मात्र या वक्तव्याबद्दल राणेंना पाठिंबा दिला असल्याचं दिसून येत आहे. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांचं ट्विट हेच सांगत आहे. भाजपा आमदार अतुल भातखळकर हे आपल्या ट्विट्सच्या माध्यमातून सतत चर्चेत असतात. आत्ताही त्यांचं हे ट्विट चर्चेत आलं आहे. भातखळकर यांनी ट्विट करून थेट राणेंच्या विधानाला पाठिंबा दिला आहे.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे बाण वर्मी लागलेले दिसतायत. मोगलाई सरकार भाजपा नेत्यांची मुस्कटदाबी करून जनतेचा आक्रोश दाबण्याचा प्रयत्न करतेय. असे ट्विट करत थेट सेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
केंद्रीय मंत्री @MeNarayanRane यांचे बाण वर्मी लागलेले दिसतायत. मोगलाई सरकार भाजपा नेत्यांची मुस्कटदाबी करून जनतेचा आक्रोश दाबण्याचा प्रयत्न करतेय. pic.twitter.com/vCUJS7lhh8
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 24, 2021