राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत. नागपुरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांत वाढ होत असताना आता एका महिलेवर अॅसिड सदृश्य द्रव्य फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
आज सकाळी 9 वाजता ही घटना घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नागपुरातील रामेश्वर परिसरात सकाळी 9 वाजता ही घटना घडली आहे. पीडित महिला ही सायकलवरुन जात असताना आरोपीने तिच्यावर अॅसिड सदृश्य द्रव्य फेकण्यात आले.
सदर आरोपी हा दुचाकीवरुन आला आणि महिलेवर अॅसिड सदृश्य द्रव्य फेकून पळ काढला. या हल्ल्यात महिला जखमी झाली असून तिला उपचारासाठी नागपुरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अॅसिड हल्ला कुणी आणि का केला? हल्ल्याचे कारण काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाहीये.