कोरोनाने जीव गमावलेल्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना महापालिकेचा आधार, ९० जणांच्या वारसांना नोकरी |

 

कोरोना रोखण्यासाठी अहोरात्र काम करताना मुंबई महानगर पालिकेच्या तब्बल २२८ कर्मचाऱयांना कोविडमुळे जीव गमवावा लागला आहे. या कर्मचाऱयांच्या कुटुंबांना पालिकेने आधार देताना आतापर्यंत ९१ जणांच्या कुटुंबांना 50 लाखांची आर्थिक मदत केली असून ९० जणांच्या वारसांना नोकरीही दिली आहे. पालिकेकडून सर्व मृत कर्मचाऱयांच्या कुटुंबांना ही मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर काही दिवसांतच रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढू लागली. यामुळे पालिकेने आपली संपूर्ण यंत्रणा कोरोना लढय़ात उतरवली. पालिकेचे सुमारे १ लाख १० हजार कर्मचारी आहेत. शिवाय शेकडो कंत्राटी कामगारही आहेत.

सर्व कर्मचारी मुंबईकरांना नागरी सुविधांसह अत्यावश्यक-वैद्यकीय सेवा देण्यासाठी काम करीत असतात. मात्र गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या दोन लाटांमध्ये हे कर्मचारी कोरोना लढय़ात स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. मात्र कोरोना लढय़ात आतापर्यंत २२८ कर्मचाऱयांना जीव गमवावा लागला आहे. पालिकेच्या ६७६६ कर्मचाऱयांना दीड वर्षाच्या कालावधीत कोरोनाची लागण झाली आहे. यातील तब्बल ५८०३ कर्मचारी कोरोनाला हरवून पुन्हा आपल्या कर्तव्यावर हजर झाले आहेत.

Team Global News Marathi: