“सरकारला आदित्य, रोहित, पार्थच्या भविष्याची चिंता, गोरगरिब पोरांची नाही” राम सातपुते यांची घागणती टीका

 

राज्यात होणाऱ्या दोन दिवशीय पावसाळी अधिवेशन चांगलेच गाजताना दिसून येणार आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधकांनी ठाकरे सरकारवर जोरदार तोफ डागली आहे.“ठाकरे सरकारला केवळ आदित्य ठाकरे, रोहित पवार आणि पार्थ पवार यांच्या भविष्याची चिंता आहे. राज्यातील गोर गरिब पोरांची चिंता नाही अशी तोफ भाजप आमदार राम सातपुते यांनी ठाकरे सरकारवर डागली आहे.

पुढे बोलताना सातपुते म्हणाले की, भाषणबाजीत केवळ शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि त्यांच्या विचारांना हरताळ फासायचं. आज अनेक विद्यार्थी परीक्षेच्या, मुलाखतीच्या, नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. हे सरकार नेमकं काय करतंय, वसूली करायला सांगण्यात व्यस्त आहे की काय?”, अशी टीका सुद्धा त्यांनी केली होती.

आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाचं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. विरोधी पक्ष भाजप सरकारला विविध मुद्द्यांवरुन घेरण्यास सज्ज झाला आहे. त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा असलेल्या एमपीएससी परीक्षेवरुन भाजप आमदार राम सातपुते यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास राम सातपुते विधिमंडळ परिसरात आंदोलन केलं.

एमपीएससी करणाऱ्या पुण्यातल्या स्वप्निलच्या आत्महत्येला हे सरकार जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी केला. रकारला काहीही देणंघेणं नाहीय. पण सरकारमधील मंत्र्यांनी जर स्वप्निलच्या आईचा आक्रोश ऐकला तर त्यांना समजेल गोरगरिब पोराबाळांचं दु:ख काय आहे… ‘केम छो वरळी…’ म्हणणं सोपंय, पण या लेकरांशी बोलणार कोण? पोरांच्या हिताचे निर्णय घेणार कोण?” अशा प्रश्नांच्या भडीमारासह आमदार सातपुते यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली.

 

Team Global News Marathi: