‘मुंबईचा विकासात परप्रांतींयाचे सुद्धा योगदान’, मनसे नेते यशवंत किल्लेदार यांचे विधान

 

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्त्वाचा मुद्दा हाती घेतल्यामुळे मनसेनं आपली परप्रांतीय भूमिका कशी बदलली अशी चर्चा राज्यभरात सुरु आहे. तर दुसरीकडे, मुंबईचा विकास हा भुमिपुत्रांमुळे झालाय आणि मेट्रो सिटी असल्यामुळे परप्रांतींयाचे सुद्धा या मध्ये योगदान आहे’ असा दावाच मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी केला आहे आता त्यांच्या या विधानामुळे नव्या चर्चेला तोंडच फुटले आहे.

राज ठाकरे जून महिन्यात अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहे. पण, राज ठाकरे यांनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि मगच उत्तर प्रदेशला यावे अशी अट भाजपचे खासदार ब्रीजभूषण सिंह यांनी घातली आहे. त्यांच्या या आव्हानाला यशवंत किल्लेदार यांनी उत्तर देतानाच परप्रांतीयांचं कौतुक केलं. भाजपचे खासदार ब्रीजभूषण सिंह हे खूप भावनिक झाले आहेत त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्याचा आदर करतो.

पण राज ठाकरे यांचा दौरा हा आधीच ठरला आहे. नियोजित वेळेप्रमाणे दौरा पार पडणार आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबरोबर बोलून प्रक्रिया पार पडल्या आहेत हा दौरा होणारच आहे, असं किल्लेदार यांनी सांगितलं ‘अयोध्येचा राज ठाकरे यांचा दौरा नियोजित आहे, त्या साठी सर्व परवानग्या घेतल्या आहेत.

मुंबईचा विकास हा भुमिपुत्रांमुळे झाला आहे आणि त्याचबरोबर मुंबईही मेट्रो सिटी आहे. परप्रांतींयाचे सुद्धा या मध्ये योगदान आहे. पण टक्केवारी अशी लावता येणार नाही. यामध्ये टक्केवारी लावली आहे ती चुकीची आहे त्यांनी ही ऐकीव माहीती बोलले राज ठाकरे यांनी या आधी त्यांची भूमिका मांडली आहे, असंही किल्लेदार म्हणाले.

Team Global News Marathi: