हमारे तरीके और तेवर बदले नहीं; मनसेचं भाजपच्या त्या खासदाराला सडेतोड प्रतिउत्तर

 

मुंबई | उत्तर भारतीयांच्या विरोधात जी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्येला येण्यापूर्वी माफी मागावी. अन्यथा त्यांना येऊ दिले जाणार नाही असा इशारा उत्तर प्रदेशातील भाजप खासदारने केले होते. यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी भाजपा खासदाराला सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे.

भाजप खासदाराने राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय महासंघापुढे केलेले भाषण ऐकावे. त्यानंतर त्यांनी ही भाषा करावी. राज ठाकरे यांनी माफी मागवी अशा वल्गना कोणी करु नये. त्या खपवून घेतल्या जाणार नाहीत. हमारे तरीके और तेवर इनमे कुछ बदलाव नाही असे तगडे प्रत्युत्तर भाजप खासदाराला मनसे आमदार पाटील यांनी दिले आहे.

कल्याण पूर्व भागातील हनुमाननगर कुष्ठरोग वसाहतीमधील समाज मंदिराच्या भूमीपूजन आमदार पाटील यांच्या हस्ते आज सायंकाळी करण्यात आले. यावेळी त्यांनी उपरोक्त इशारा दिला आहे. तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपने एका व्यंगचित्रकाराचा गळा घोटला अशी टिका केली होती.

या टिकेचाही समाचार घेताना आमदार पाटील यांनी सांगितले की, संजय राऊतांना काही कामधंदे नाहीत. स्वत:चा पक्ष ज्यांनी पवार साहेबांच्या पायाशी नेऊन ठेवला. तेव्हा आम्ही असे बोलायचे का पवार साहेबांच्या माध्यमातून एका फोटोग्राफरचा आणि पक्षाचा गळा घोटला असा टोला आमदार पाटील यांनी लगावला होता.

Team Global News Marathi: