मुंबईत शिवसेना आणि शिंदेगट आमनेसामने, शिंदे गटाकडून म्याव..म्यावच्या घोषणा

 

राज्यात शिंदे गटाचे सरकार स्थापन झाल्यानंतत ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात वाद वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे अशातच मुंबईत सार्वजनिक उत्सव मंडळाच्या मिरवणूका ह्या शांततेत होत असताना प्रभादेवी परिसरात शिवसेना आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते हे आमने-सामने आले होते. संजय भगत आणि समाधान सरवणकर यांचे कार्यकर्ते हे समोरासमोर आले होते.


समाधान सरवणकर यांच्याकडून म्याव..म्याव अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. त्यावरुन वातावरण तापले होते. त्यानंतर मात्र, दोन्ही गटात घोषणाबाजी झाली. घटनेची माहिती मिळताच प्रभादेवी परिसरात पोलीस बंदोबस्ताही वाढवण्यात आला होता. शिंदे गट आणि शिवसेनेचे कार्यकर्ते हे एकमेकांच्या समोरा-समोर आल्याने काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

प्रभादेवी परिसरात विसर्जन मिरवणूक असतानाच शिंदे गटातील पदाधिकारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी हे समोरा-समोर आले होते. दरम्यान, शिंदे गटातील कार्यकर्ते हे म्याव..म्याव असा आवाज काढत असल्याचे समोर आले आहे. पण उपस्थित पोलीसांमुळे अधिकचा गोंधळ झाला नाही.

Team Global News Marathi: