मुंबईत पाच वेळ हनुमान चालीसा ऐकणार यासाठी राज ठाकरेंचे आभार मानतो

 

मशिदीवर असलेले अनधिकृत लाऊडस्पीकर हटवण्यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महत्वपूर्ण विधान केले होते या विधानानंतर काल घाटकोपर येथे मशिदीच्या बाहेर लाऊड-स्पीकरवर हनुमान चालिला लावण्यात आला होता याच पार्श्वभूमीवर आता राज्यात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आहे. “मुंबईत रोज आता पाच वेळा लोक हनुमान चालीसा ऐकतील यासाठी मी मनापासून राज ठाकरे यांचे आभार मानतो.

ज्यावर अजान होते असे अनधिकृत लाऊडस्पीकर उतरवले पाहिजेत. मुंबई पोलीस आयुक्तांनीही यावर कारवाई केली पाहिजे. ही मागणी गेल्या काही दिवसांपासून भाजपद्वारे करण्यात येत होती. तसंच हा जो विषय राज ठाकरे यांनी उचलला आहे, त्यांना सर्व हिंदूंचे आभार आहेत,” असं वक्तव्य भाजपचे मोहित कंबोज यांनी केलं

 

“जर अनधिकृत लाऊडस्पीकर्स असतील तर उतरवले गेले पाहिजे असे न्यायालयाचेही निर्णय आले आहेत. संजय पांडे यांनी न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करावी आणि अनधिकृत लाऊडस्पीकर वरून जे अजान होतात, ते उतरवून टाकावे,” असं मोहित कंबोज म्हणाले. तसेच “आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. अजान ही झालीच पाहिजे. परंतु लाऊडस्पीकरवर जी अजान होते ती बंद झाली पाहिजे ही आमची मागणी आहे मुंबई पोलीस आयुक्तांकडे आहे असंही ते म्हणाले.

Team Global News Marathi: