विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून रेल्वेन कमावले इतके कोटी रुपये !

 

मुंबई | रेल्वेत विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अद्दल घडवण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून थेट कारवाई करण्यात येत आहे. अशातच आता २०२१-२२ या आर्थिक वर्षात मध्य रेल्वेने विनातिकीट प्रवाशांकडून मोठी रक्कम वसूल केली आहे.विना प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून प्रवाशांकडून मध्य रेल्वेने २१४ कोटी रुपये दंड वसूल केला आहे.

मुंबईतील प्रवासी त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी लोकल ट्रेनवर सर्वाधिक अवलंबून असतात. म्हणूनच या लोकल गाड्यांना मुंबईची लाईफ लाईन असंही म्हणतात. दररोज लाखो लोक लोकल ट्रेनमधून प्रवास करतात आणि इच्छित स्थळी पोहोचतात. कोरोनाच्या काळात लोकल ट्रेनच्या वेगाला ब्रेक नक्कीच लागला होता.

मात्र यादरम्यान लोकल ट्रेनमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली होती. यादरम्यान, लोकलमध्ये एक चेकिंग टीम असायची आणि ते प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला तिकिटाबद्दल विचारलं जायचं. विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून रेल्वेचे टीटी दंड वसूल करत असत. मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकानं ३५.३६ लाख लोकांवर कारवाई करून २०२१-२२ या वर्षात २१४.१४ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्याचं हेच मुख्य कारण आहे.

Team Global News Marathi: