मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आक्रमक

 

मुंबई | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधक सतत महाविकास आघाडीवर टीका करताना दिसून येत आहेत. अशातच मुंबई महानगर पालिका निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिलेले असताना सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाच्या अडचणी वाढवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. अशातच मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार, नियमन समितीत करण्यात आलेले बदल आणि बदल करण्यात आलेल्या विद्यापीठ कायद्यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी आज राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला.

त्यावेळी ते म्हणाले, “राणीच्या बागेतील दुर्मिळ प्राण्यांचे वास्तू बनवण्यासाठी देण्यात आलेल्या 106 कोटी कंत्राट प्रकरणात राज्यपालांकडे तक्रार केली आहे. आता लोकायुक्तांकडे तक्रार करणार आहे. त्यानंतर याबाबत न्यायालयातही जनहित याचिका दाखल करणार आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, ” राज्यपाल हे मंत्रीपदाची शपथ देत असतात. ही शपथ घेताना कोणत्याही एका व्यक्तीच्या व्यक्तीगत फायद्यासाठी काम करणार नाही अशी शपथ घेतलेली असते. ही शपथ राज्यपाल देत असतात. त्यामुळे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या छाबय्या विहंग गार्डनला दंड माफी करून राज्यपालांनी दिलेल्या शपथेचा भंग करण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही याबाबत राज्यपालांना भेटून तक्रार केली आहे.

Team Global News Marathi: