मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या भावाची सोनू निगमला धमकी,

 

मुंबई | मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल पुन्हा एकदा चढचेत आले आहे मात्र यावेळी ते आपल्या भावामुळे चर्चेत आले असून त्यांच्या भावाने गायक पद्मश्री सोनू निगम याला धमकी दिली आहे. इक्बाल सिंह चहल यांचा भाऊ रजिंदर याने सोनू निगमला धमकी दिली आहे. इक्बाल सिंग चहल यांनी त्यांचा भाऊ राजिंदरसाठी सोनूला कार्यक्रम करण्याची विनंती केली होती.

मात्र सोनू निगम सध्या काही कामात व्यस्त असल्याने त्याने काही आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांची नावं सुचवली. पण ही गोष्ट रजिंदर यांना आवडली नाही आणि त्यांनी सोनू निगमला काही मेसेज केले.यातले काही मेसेजेस आक्षेपार्ह आहेत. त्या मेसेजमधली भाषा योग्य नाही. या मेसेजच्या माध्यमातून सोनूला धमकी देण्यात आली आहे, अशी माहिती आहे.

इक्बाल सिंह चहल यांचा भाऊ रजिंदर याने सोनू निगमला धमकी दिली आहे. इक्बाल सिंग चहल यांनी त्यांचा भाऊ राजिंदरसाठी सोनूला कार्यक्रम करण्याची विनंती केली होती. सोनू सध्या काही कामात व्यस्त असल्याने त्याने काही आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांची नावं सुचवली. पण ही गोष्ट रजिंदर यांना आवडली नाही आणि त्यांनी सोनू निगमला काही मेसेज केले.यातले काही मेसेजेस आक्षेपार्ह आहेत. त्या मेसेजमधली भाषा योग्य नाही. या मेसेजच्या माध्यमातून सोनूला धमकी देण्यात आली आहे, अशी माहिती आहे. सोनू निगमने या मेसेजसचे काही स्क्रिनशॉटही सार्वजनिक केले आहेत.रजिंदर हे सध्या इक्बाल सिंह चहल यांच्याचसोबत राहत असल्याची माहिती आहे.

Team Global News Marathi: