विरोधात असले की ईडी आणि भाजपात आले की घोटाळामुक्त, हे औषध कोणतं?

 

पुणे | नवाब मलिक यांना अटक होताच राज्यातील राजकीय वातावरण चनळेच तापू लागले होते. तसेच विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडी आणि नवाब मलिकांवर गंभीर आरोप करून गेले. अंडरवर्ल्डशी संबध असणाऱ्यांना वाचवणे अतिशय निदनिय आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना काही थेट सवाल केले आहेत. अमित शहांना माझे दोन प्रश्न आहेत, विरोधात असले की ईडी लावता आणि तुमच्या पक्षात आले की ईडी गायब होते तुम्ही कोणते औषध वापरता ते सांगा, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी शाह यांना सवाल केले आहेत. ईडीचा पेपर फुटतो त्यांच्यावर कारवाई का होत नाही? महाराष्ट्र खूप अडचणीच्या काळात चालला आहे. दिल्लीची माणसं महाराष्ट्राचा अपमान करत आहेत. पण दिल्लीसमोर मोडेल पण वाकणार नाही, असे सुप्रिया सुळे यांनी ठणकावले आहे.

तसेच लढेंगे जरुर जितेंगे जरुर.आपल्याला ईडीची नोटीस आली की राज्यात आपले सरकार येते. पहिली नोटीस आली तेव्हा महाराष्ट्रात सरकार आले, झेडपीत आम्ही त्यांना झिरोवर आणणार आहे. काही लोकांना त्यांची जागा दाखवावी लागते. असेही त्या म्हणाल्या. भाजपला उद्देशून बोलताना, आम्ही तुमच्यामागे ईडी वगैरे लावणार नाही. तिसरी नोटीस आली की देशात सत्ता येईल. असा इशाराही त्यांनी दिला आहे

Team Global News Marathi: