मुंबईची लोकल सेवा सुरु होणार का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात की,

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आघाडी सरकारच्या निर्णयावर अनेकदा टीका करताना दिसून आले आहे. तसचे मुख्यमंत्री सुद्धा विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर देताना आढळून आले आहेत.

मुंबई मनपाच्या एच. पश्चिम विभागातील कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी विरोधकांवर टीका करतानाच त्यांनी कोरोना मुद्द्यावर भाष्य केलं. एक नवीन संकट आलं आहे. काही महिन्यांचा, दिवसांचा पाऊस काही तासांत पडत आहे. पूर परिस्थिती निर्माण होत आहे.

आज मुंबईतच नाही तर जगभरात ही स्थिती आहे. तिकडच्या पालिका तर आमच्या ताब्यात नाहीत. चीनमध्ये पूर आला. तिथे आपली पालिका नाही तरी पूर आला. त्याला जबाबदार कोण? चिपळून, महाड, सातारा, सांगली, कोल्हापूर ठिकाणी पूर, दरड कोसळल्या. मुंबई पालिकेने तिकडेही मदतीची टीम पाठवली, असं मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी काळजी घेण्यासारखी परिस्थिती आहे. जिथे परिस्थिती चांगली आहे, तिथे निर्बंध शिथिल केले जात आहेत. जिथे शिथिलता देऊ शकत नाही, तिथे नाईलाज आहे. याचा अर्थ असा नाही की सर्व कायमचं बंद असेल. लोकल कधी सुरु होणार असा प्रश्न विचारला जात आहे. त्यावर विचार सुरु आहे. अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. राज्यातही शिथिलता देण्यात येणार आहे. पण, जबाबदारीचं भान ठेवून सवलत देणार आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Team Global News Marathi: