मुंबई क्रुझ प्रकरण पुर्णपणे खोटं, शाहरूख खान त्यांच्या निशाण्यावर’

 

मुंबई | कॉर्टेलिया क्रुझवर एनसीबीनं छापा टाकून अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह ८ जणांना ताब्यात घेतले होते. यानंतर आर्यनच्या अरेस्ट मेमोमध्ये याचा संपूर्ण तपशील देण्यात आला आहे.विशेष म्हणजे आर्यनने स्वत: आपल्या लेन्सच्या डब्ब्यातून ड्रग्ज नेल्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या घटनेनंतर सर्वच स्तरातून यावर विविध प्रतिक्रिया येत असून काहींनी टीका केली आहे तर काहींनी समर्थन केले आहे.

या घटनेनंतर चित्रपट सृष्टीत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आर्यनच्या अरेस्ट मेमोमध्ये याचा संपूर्ण तपशील देण्यात आला आहे. विशेष म्हणजे आर्यनने स्वत: आपल्या लेन्सच्या डब्ब्यातून ड्रग्ज नेल्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आर्यन खानसह अन्य जणांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. जेष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनीही आता यावर प्रतिक्रिया देत शंका उपस्थित केली आहे.

यामध्ये अनेक गोष्टी या अतिशयोक्तीपूर्ण आहेत. तसेच काही गोष्टी जास्तच रंगवून सांगितल्या आहेत, असं सिन्हा म्हणाले आहेत. बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण जसं सांगितलं जात आहे, तशी परिस्थिती नाही. मुद्रा बंदरावर मोठ्या प्रमाणावर ड्रग्स सापडले आहेत, अशी चर्चा असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच मुंबई क्रुझ प्रकरणात शाहरूख खान निशाण्यावर असू शकतो, असं सिन्हांनी म्हटलं आहे.

Team Global News Marathi: