…पुन्हा लखीमपूर मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी साधला पंतप्रधान मोदींवर निशाणा

 

नवी दिल्ली | लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय गृह राज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला अनेक प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत, तसेच चौकशीला तो सहकार्य़ करत नसल्याचे पोलिसांनी सांगितले असून या प्रकरणावर मौन बाळगले आहे.

लखीमपूर घटनेच्या मुद्द्यावरून आशिष मिश्राची १२ तास चौकशी करण्यात आली. यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. “मंत्र्याची हकालपट्टी न करून भाजपाने न्याय प्रक्रियेत अडथळा आणला आहे. केंद्र सरकारला ना शेतकऱ्यांच्या कुटुंबांची काळजी आहे, ना हत्या झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांची” असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

Team Global News Marathi: