Mumbai Breaking | कोरियोग्राफर गणेश आचार्यवर लैंगिक छळाचा आरोप

 

मुंबई | मुंबई पोलिसांनी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य यांच्यावर लैंगिक छळ, पाठलाग आणि मारहाणीच्या आरोपाखाली आरोपपत्र दाखल केलं आहे. गणेश आचार्य यांच्यावर 2020 मध्ये त्यांच्या एका को-डान्सरने आरोप केले होते. याप्रकरणी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं आहे. या प्रकरणाचा तपास करणारे ओशिवराचे पोलीस अधिकारी संदीप शिंदे यांनी म्हटलं आहे, अंधेरी येथील संबंधित महानगर दंडाधिकारी न्यायालयात नुकतंच आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.

टाईम्सच्या रिपोर्टनुसार, संदीप शिंदे यांनी सांगितलं की, गणेश आचार्य आणि त्याच्या सहाय्यकाविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 354-A, 354-C (स्टारिंग), 354-डी (गणेश आचार्य लैंगिक छळ प्रकरण) , 509 (कोणत्याही महिलेच्या प्रतिष्ठेचा अपमान करणे), 323 (दुखापत करणे), 504 (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान करणे), कलम 506 (गुन्हेगारी धमकी) आणि 34 (गुन्हा करण्याचा सामान्य हेतू) या सर्व आरोपांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

35 वर्षीय को-डान्सरने सांगितलं की, ”तिला पोलिसांनी आरोपपत्र दाखल करण्यात आल्याचं म्हटलं आहे. गणेश आचार्य यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. अनेक सहकर्मचाऱ्यांनी यापूर्वीही गणेशवर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. गणेशने त्यांना वारंवार नाकारलं असून सर्व आरोप खोटे आणि निराधार म्हटलं आहे.

Team Global News Marathi: