दोन दिवसांत महाराष्ट्रातील भाजपचे दोन नेते अडचणीत, वादग्रस्त विधान भोवनार

 

गेल्या दोन दिवसांत भाजपच्या दोन नेत्यांनी केलेल्या विधानामुळे ते अडतणीत येताना दिसत आहेत. कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत माजी खासदार धनंजय महाडीक यांनी जे पती करेल ते पत्नी करू शकणार आहे का असे म्हणत काँग्रेसच्या उमेदवाराला कमी लेखण्याचा प्रयत्न केलाय. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारावेळी धनंजय महाडिक यांनी हे विधान केलं आहे.

धनंजय महाडिक यांनी केलेल्या या वक्तव्याचा महिलांच्याकडून निषेध करण्यात येत आहे. महिलांना कमी लेखण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप करत काळ्या साड्या परिधान करत आज महिलांनी त्यांचा निषेध केला.

प्रचारसभेत धनंजय महाडिक म्हणाले, काँग्रेसचे लोकं येतील आणि म्हणतील महिला उमेदवार आम्ही दिली आहे. तुम्ही सर्व महिला आहात, ती बिचारी आहे, तिला मतदान करा… मला सांगा तुमच्या कुटुंबातील एखादा व्यक्ती प्लंबिंगचं काम करत असेल तर तुम्हाला त्याचं प्लंबरचं काम जमणार आहे का? इलेक्ट्रिशियन असलेला नवरा करतो, त्याचं काम तुम्हाल जमणार आहे का? त्यामुळे ज्याचं काम त्याने करावं. धनंजय महाडिक यांनी केलेल्या या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

Team Global News Marathi: