मुंबईच्या समुद्र किनारी, तलावांवर छटपूजेस ठाकरे सरकारकडून बंदी

 

मुंबई | दरवर्षी छटपूजेसाठी मुंबईच्या विविध समुद्र किनारी आणि तलावांवर मुंबईत मोठी गर्दी उत्तर भारतीय बांधव करीत असतात. मात्र यंदाच्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मुंबई महानगरपालिकेने मुंबईच्या समुद्र किनारी आणि तलावांवर छटपूजेस बंदी घातली आहे. मात्र उत्तर भारतीय बांधवांना छट पूजा साजरी करता यावी म्हणून शिवसेना मात्र धावून आली आहे.शिवसेनेने मुंबईत छटपूजेसाठी कृत्रिम तलाव तयार करण्यास सुरुवात केली आहे.


कुर्ला, साकीनाका, चांदीवली, पवई या परिसरात शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांच्या वतीने चार कृत्रिम तलाव छटपूजेसाठी तयार करण्यात येत आहेत. या ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून काळजी घेण्यात आली आहे.तसेच औषध फवारणी, मास्क सक्ती ने घालूनच प्रवेश असे नियमही करण्यात आले आहेत. तसेच कोरोना संसर्गाची नियम पाळण्याचे आव्हान करण्यात आले आहे

छट पूजा ही उत्तर भारतातील स्त्रिया करीत असलेली एक प्रकारची सूर्य पूजा आहे. छटव्रत स्वीकारून ही पूजा करण्यात येते. या व्रतादरम्यान स्त्रिया निर्जल उपवास करतात व सूर्याला अर्घ्य देऊन हा उपवास सोडण्यात येतो.हे व्रत सौभाग्य व समृद्धीसाठी आणि संतानप्राप्तीसाठी करण्यात येते. उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, बिहार व झारखंड राज्यात हे व्रत मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येते.

Team Global News Marathi: