मुख्यमंत्र्यांकडून ठाण्यात मध्यरात्री ध्वजारोहण; शेकडो ठाणेकर उपस्थित

 

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ठिकठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. याचंच औचित्य साधून मध्यरात्री बारा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या शिवसेना शाखेत ध्वजारोहण केलं. आनंद दिघे जिल्हाध्यक्ष असताना मध्यरात्री ध्वजारोहण करण्याची चाळीस वर्षापुर्वीची परंपरा मुख्यमंत्र्यांनी कायम ठेवली असल्याचं हे दिसून आलं आहे.

दुसरीकडे मात्र या कार्यक्रमात शिंदे गट विरुद्ध उद्धव गट असा सामना देखील रंगणार होता. कारण ठाकरे गटात असलेले राजन विचारे यांना पोलिसांची नोटीस देऊनसुद्धा ते या कार्यक्रमात हजर होते. यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. परंतु सुदैवानं कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री १२ वाजता ठाण्याच्या शिवसेना शाखेत ध्वजारोहण केलं. यावेळी शेकडो नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते. आनंद दिघे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी चाळीस वर्षांपूर्वी मध्यरात्री ध्वजारोहण करण्याची परंपरा सुरू केली होती, तिच परंपरा आज एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यावर देखील कायम ठेवली आहे.

ध्वजारोहण झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “अमृत महोत्सव देशभरात जल्लोषात साजरा होत आहे. देशभक्तीची लाट नागरिकांमध्ये उत्पन्न झाली आहे. सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो. ज्ञात अज्ञात सेनानींनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं, त्यांना अभिवादन करतो. आनंद दिघे यांनी ही ठाण्यात परंपरा सुरू केली त्याचा आनंद होतोय, राज्यातही घराघरावर तिरंगा कार्यक्रम आयोजित करण्यात आला

Team Global News Marathi: