मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे पाटणकरांच्या अन्य मालमत्ताही ईडीच्या नजरेत

 

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या आणखीन काही मालमत्ता ईडीच्या रडारवर आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तसे एडी मोठी कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पाटणकरांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. कंपनीला हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी याने बनावट कंपनीच्या माध्यमातून एकूण ३० कोटींचे विनातारण कर्ज दिले. ही रक्कम पाटणकरांनी अन्य बांधकाम प्रकल्पातही वापरल्याचा ईडीला संशय आहे. त्यामुळे ईडीचे अधिकारी पाटणकरांच्या कंपनीने राबविलेल्या अन्य प्रकल्पांचीही माहीती गोळा करत आहेत.

ईडीने पाटणकरांची भागीदारी असलेल्या ठाण्यातील पाचपाखाडी परिसरातील आणखी एका गृहनिर्माण प्रकल्पावर कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. ईडीच्या काही अधिकाऱ्यांनी गुरुवारी या गृहनिर्माण प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. या प्रकल्पात चतुर्वेदीने आर्थिक गुंतवणूक केल्याचा ईडीला संशय आहे.

तसेच पाटणकरांच्या मुंबई आणि ठाण्यातील प्रकल्पांचीही झाडाझडतीही ईडीचे अधिकारी करत आहेत. दुसरीकडे याप्रकरणातील महत्त्वाचा दुवा असलेल्या चतुर्वेदीच्या शोधासाठी ईडीचे पथक मुंबईबाहेर आहेत. त्याला समन्स बजावूनदेखील ते हजर न झाल्यामुळे त्यांना दुसरे समन्स बजावण्यात येणार आहे. तसेच, ते परदेशात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Team Global News Marathi: