“कोल्हापूर रुग्णालयात उपचारादरम्यान माझ्या हत्येचा कट रचला होता”

 

मुंबई | सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती.मात्र, तब्येत अस्वस्थ असल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सिंधुदुर्गातून नितेश राणे यांना कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, त्यावेळी आपल्या हत्येचा कट रचण्यात आला होता आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्याने मला आधीच सांगण्यात आल्याने मी वाचलो असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.

त्यावेळी एका प्रकरणात मला गोवण्यात आलं. त्या दरम्यान मला पोलीस आणि प्रशासनाचा आलेला अनुभव थक्क करणारा आहे. या सभागृहाच्या माध्यमातून गृहमंत्र्यांकडे मला माहिती द्यायची आहे की, कोल्हापूरच्या जिल्हा रुग्णालयात मला उपचारासाठी दाखल केलं होतं. अचानक डॉक्टर माझ्याकडे आले आणि आग्रह करु लागले की, नितेशजी तुमची अँजिओ करण्याची गरज आहे. मी म्हटलं मला तसं तरी वाटत नाही. तर मला सांगितलं की, नाही तुम्हाला सीटी अँजिओ करण्यास सांगितलं आहे. रुग्णालयातील काही लोक आमच्याही ओळखीचे आहेत.

एका कर्मचाऱ्याने मला येऊन सांगितलं की, साहेब हे सीटी अँजिओ करु नका, त्या निमित्ताने एक इंक शरीरात टाकण्यात येते आणि त्यानिमित्ताने तुम्हाला मारुन टाकण्याचा प्लॅन आहे. नितेशजी कुठल्याही परिस्थितीत होकार देऊ नका. हा प्रकार माझ्यासोबत कोल्हापुरातील रुग्णालयात झाला आहे असंही नितेश राणे म्हणाले. नितेश राणे यांनी पुढे म्हटलं, माझी शुगर लेवल लो दाखवत होती, तरीही रात्री अडिच वाजता २०० पोलीस मला डिस्चार्ज करण्यासाठी पाठवले होते अशी माहिती राणे यांनी दिली होती.

Team Global News Marathi: