खासदार राजीव सातव यांनी अखेर केली कोरोनावर मात, रिपोर्ट आला निगेटिव्ह!

राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांनी कोरोनावर मात केली आहे. मागच्या अनेक दिवसांपासून त्यांची तब्येत कोरोनामुळे खालावली होती. मात्र अखेर त्यांच्या रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करण्याऱ्या पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिलेली आहे. त्यामुळे लवकरच राजीव सातव यांना रुग्ण्यालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

खासदार राजीव सातव यांना एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांना पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु, काही दिवसांची त्यांची प्रकृती अचानक खालावली होती. त्यामुळे त्यांना तातडीने मुंबईला हलवण्याचा प्रयत्न करण्यात आला होतं. तसेच काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी सुद्धा त्यांच्या तब्यतीची चौकशी केली होती. यासाठी खास लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांना पाचारण करण्यात आले होते.

मात्र अखेर 19 दिवसांच्या उपचारानंतर राजीव सातव यांची कोरोनाची चाचणी निगेटीव्ह आली आहे. त्यांना लवकरच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येण्याची शक्यता आहे. राजीव सातव हे काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आहे. विशेष म्हणजे, राहुल गांधी यांचे ते विश्वासू सहकारी मानले जातात. मागील वर्षी अहमदबादमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं निधन झाल्यामुळे गुजरातच्या प्रभारीपदी राजीव सातव यांची निवड झाली. राजीव सातव हे हिंगोली मतदारसंघातून खासदार म्हणून 2014 साली निवडून आले होते.

Team Global News Marathi: