सुप्रीम कोर्टाला टास्क फोर्स नेमावी लागते, केंद्र सरकार काय करतंय? – बाळासाहेब थोरात

संपूर्ण देशात वाढत असलेल्या कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने टास्क फोर्सची निर्मिती केली आहे. याच मुद्द्यावरून आता काँग्रेस नेते आणि मंत्री बाबासाहेब थोरात यांनी मोदी सरकारला टोला लगावला आहे. कोरोना रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला टास्क फोर्स नेमावी लागत आहे, मग केंद्र सरकार करतंय काय?, असा संतप्त सवाल बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला आहे.

बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेऊन हा संतप्त सवाल केंद्रातील मोदी सरकारला केला आहे. केंद्राकडे कोरोना रोखण्यासाठी कोणतंही धोरण नाही. नियोजन नाही. सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करून कोरोना रोखण्यासाठी टास्क फोर्स नेमावी लागते. मग केंद्र सरकार करतंय काय?, असा सवाल थोरात यांनी केला आहे. कोरोनाची संपूर्ण जबाबदारी घेऊन प्लानिंग करायला कोर्ट सांगत आहे. पण केंद्र जबाबदारी घेत नाही. सर्व जबाबदाऱ्या राज्यांवर ढकलून देत आहेत. आज देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याला सर्वस्वी केंद्र सरकारच जबाबदार आहे, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.

देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना कुंभमेळा आणि निवडणुका घेतल्या गेल्या. त्यामुळे कोरोनाचा स्फोट झाला. त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे. त्याचे परिणाम देश भोगत आहे. कोरोना वाढवण्यात देशाचं नेतृत्व जबाबदार आहे. त्याचे परिणाम देश भोगत आहे, असं सांगतानाच देशाचं लसीकरण होण्याआधीच लस निर्यात करणं हा केंद्र सरकारचा दांभिकपणा होता, अशी जळजळीत टीका थोरात यांनी केली आहे.

Team Global News Marathi: