मोठी बातमी | नवाब मलिकांना धक्का, न्यायालयीन कोठडीत १८ एप्रिलपर्यंत वाढ

 

मुंबई | दाऊद इब्राहिम, त्याचे कुटुंबीय आणि टोळीतील सदस्यांसंबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांचा कारागृहातील मुक्काम आणखी वाढला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नवाब मालिकांना कोर्टाकडून दिलासा मिळाले नाहीये.

मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टाने मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत १८ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. तर न्यायालयाच्या आदेशानुसार मलिक यांना कोठडीत बिछाना, खुर्ची उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसंच त्यांना घरचं जेवण आणि औषधं घेण्यासही न्यायालयाने परवानगी दिली आहे.

ईडीने २३ फेब्रुवारीला मलिक यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे. यामध्ये त्यांना २१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावत त्यांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली होती. त्यानंतर मलिकांच्या कोठडीत ४ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली होती. आज पुन्हा एकदा न्यायालयात हजर केलं असताना मलिकांना दिलासा देण्यास कोर्टाने नकार दिला आहे.

मात्रउच्च रक्तदाब व मधुमेह असल्याने कमी मीठ असलेले घरचे जेवण मिळावे, अशा विनंतीचाही अर्ज करण्यात आला होता. त्यावर मलिक यांचा वैद्यकीय अहवाल पाहून त्यांना औषधं आणि घरगुती जेवण घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Team Global News Marathi: