भाजपा- मनसे युतीचा सध्या कुठलाही प्रस्ताव नाही, पण भविष्यात…;

 

मुंबई | गुढी पाडव्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीसह संपूर्ण महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. तसंच अनेक मुद्द्यांवर त्यांनी आपलं परखड मतही मांडलं. अनेकांनी यानंतर राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. अशातच गुढी पाडवा मेळाव्याच्या दुसऱ्याच दिवशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. राज ठाकरे आणि गडकरी यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने भाजप-मनसे युती होणार का, याची चर्चा रंगली आहे. मात्र भाजपा आणि मनसे युतीचा सध्या कुठलाही प्रस्ताव नसल्याचं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे गडकरी आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर युती संदर्भात सुरु असलेल्या राजकीय चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

संदीप देशपांडे ट्विटरद्वारे म्हणाले की, एक तर गोष्ट स्पष्ट आहे की, भाजप मनसे युतीचा सध्या कुठलाही प्रस्ताव नाही. भविष्यात काय होईल माहीत नाही. पण मनात प्रश्न येतो शिवसेना, राष्ट्रवादी यांनी लोकसाक्षीने व्याभिचार केला, तरी यांना प्रश्न विचारायचे नाहीत आणि आमच्या अफवा उठल्या तरी यांना मिरच्या झोंबतात हे फारच झालं, असं संदीप देशपांडे यांनी सांगितलं.

Team Global News Marathi: