लसीचा पहिला डोस कोव्हीशीलडचा आणि दुसरा डोस कोव्हॅक्सिनचा पर्यावरण राज्यमंत्र्यांचा जे जे रुग्णालयावर आरोप

मुंबई : संपूर्ण देशभरात कोरोना लसीकरणाला सुरवात झालेली आहे. त्यात आता सर्वसामान्य नागरिकांसह राजकीय पुढारी सुद्धा कोरोनाची लस टोचून घेत आहे. त्यातच आता आघाडीच्या मंत्र्याने जे जे रुग्णालयावर गंभीर आरोप लावले आहे.

मला जेजे रुग्णालयात लसीचा पहिला डोस कोव्हीशीलडचा आणि दुसरा डोस कोव्हॅक्सिनचा देण्यात आला, असा गंभीर दावा पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केला. त्यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र, हा दावा जेजे रुग्णालयाने फेटाळला आहे. पर्यावरण मंत्री संजय बनसोडे यांचा काहीतरी गैरसमज झाला आहे, असं जेजे रुग्णालयाने म्हटलं आहे.

संजय बनसोडे अधिवेशनानिमित्त मुंबईत होते. त्यावेळी त्यांनी जेजे रुग्णालयात पहिला डोस सिरम कंपनीच्या कोव्हिशिल्डचा घेतला होता. शुक्रवारी लसीचा दुसरा डोस त्यांनी घेतला. काल जो डोस त्यांना देण्यात आलेला होता तो कोव्हॅक्सिनचा म्हणजेच भारत बायोटेक कंपनीचा होता, असा दावा संजय बनसोडे यांनी केला.

काल संजय बनसोडे यांना लस घेतल्या नंतर हा प्रकार लक्षात आला. त्यांनी लस देणाऱ्या नर्सला कोणती लस दिली असा सवाल केला असता नर्सने कोव्हॅक्सिनचा दिल्याची माहिती दिली. “मला चुकीची लस दिली त्यामुळे मी प्रचंड घाबरलो होतो. मी मंत्री आहे, मला वाचता येतंय म्हणून मला लक्षात आलं. अशिक्षित, ज्यांना वाचता येत नाही त्या माणसाचं कसं होणार?” असा सवाल बनसोडे यांनी केला आहे.

Team Global News Marathi: